मित्रानो, सर्वांसाठी घरे – २०२४ हे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. या धोरण अंतर्गत बेघर व कच्चे घरात राहणाऱ्या लाभार्थ्याना या घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत बरेच लाभार्थी या योजनेत अंतर्भूत होऊ शकले नाहीत. अशा लाभार्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाभार्थी पात्रता –
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
- लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.
- लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा
- एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन:श्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
- लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.
आवश्यक कागदपत्रे –
७/१२ उतारा / मालमत्ता नोंदपत्र / ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल / मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
प्राधान्यक्षेत्र
लाभार्थी यादी पात्र करतांना ग्रामसभेने विचारात घ्यावयाचे प्राधान्यक्षेत्र खालीलप्रमाणे असतील.
- घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा / परितक्त्या महिला, कुटुंब प्रमुख.
- पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी.
- जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती.
- नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती.
- दिव्यांग व्यक्ती :- उद्दिष्टाच्या किमान ५% उद्दिष्ट दिव्यांगांकरीता राखीव ठेवणे आवश्यक
- इतर पात्र कुटुंबे.