मित्रांनो, आता आपल्याला खालील प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे उंबरवठे झिजवण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनाने या बाबत एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. खालील प्रमाणपत्रे हे स्वयं घोषणा स्वरुपात घेण्यात यावे असे सांगितले आहे. तरीही मित्रांनो बऱ्याच जणांना या विषयी माहिती नाही.
मित्रांनो बऱ्याच कार्यालयामध्ये आज हि ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या सही शिक्क्याचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास सांगतात, आणि आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे ग्रामसेवक/तलाठी यांचे कार्यालायच्या उंबरठ्यावर चकरा मारत असतो, कधी ग्रामसेवक/तलाठी भेटतो तर कधी नाही, तर तो कधी एखादी मिटिंग मध्ये असतात किवा एखाद्या खेड्यावर असतात. आणि आपली बेजारी होते. आपला वेळ आणि पैसा वाया जातो, आपला मानसिक त्रास होतो. त्यामुळे मित्रानो शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध करून आपले काम सोपे केले आहे. एखाद्या फाईलला खालील प्रमाण पत्रे आपण स्वयं घोषणा स्वरुपात जोडू शकता.
आपण स्वयं घोषण फाईलला स्वयं घोषणा जोडले तरीही तरीही काही कार्यालयामध्ये आपल्याला अशा प्रमाणपत्राची मागणी केली जाते, एक तर त्यांना याविषयी माहिती नसते किंवा त्यांना तुमची मुद्दाम बेजारी करावयाची असते. आणि आपण ग्रामसेवक/तलाठी यांचे कडे गेलो तर ते या बाबत स्वयं घोषणा पत्र जोडावयास सांगतात. आणि आपल्याला सदरील प्रमाणपत्र दिले जात नाही अशावेळी आपल्याला मानसिक त्रास होतो.
अशावेळी मित्रानो तुमच्याजवळ शासन निर्णयाची माहिती असणे आवश्यक आहे. या संबधीचा शासन निर्णय काळजीपूर्वक वाचा. आणि कोणत्याही ग्रामसेवक/तलाठी यांच्या पाठीमागे न लागता स्वयं घोषणा प्रमाणपत्र जोडा आणि ज्या कर्मचारी यांना माहिती नाही त्यांना या शासन निर्णय बद्दल समजावून सांगा. हा शासन निर्णय म्हणजे आपली बेजारी वाचण्यासाठी/आपल्या सोईसाठी आहे,
स्वयं घोषणापत्रे
स्वयं घोषणापत्रे | Download Link |
रहिवाशी स्वयं घोषणापत्र | Download |
हयात स्वयं घोषणापत्र | Download |
नोकरी नसल्याचे स्वयं घोषणापत्र | Download |
विजेच्या जोडणीसाठी नाहरकत स्वयं घोषणापत्र | Download |
विधवा स्वयं घोषणापत्र | Download |
विभक्त कुटुंब स्वयं घोषणापत्र | Download |
बेरोजगार स्वयं घोषणापत्र | Download |
लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र | Download |
शौचालय स्वयं घोषणापत्र | Download |
कृषी साहित्य खरेदी स्वयं घोषणापत्र | Download |
(सदरील प्रमाणपत्रे आपल्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहेत,हे तंतोतंत खरे आहेत याचा दावा आम्ही करत नाहीत.कोणत्याही नुकसानीस आम्ही जबादार असणार नाहीत. त्यासाठी कायदेशीर बाबीचा आधार घ्यावा.)