मित्रांनो, तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर त्यासाठी काय करावे ? कृषी सेवा केंद्र सुरु करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? तसेच त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील. तर या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया..
आपण कृषी सेबा केंद्र मध्ये शेती संबंधित कीटकनाशके, खते, बी-बियाणे उत्पादन, साठवणूक इ बाबी विषयी विचार केला जातो. परंतु मित्रांनो यासाठी आपल्याला अधिकृत परवाने काढावे लागतात.
लागणारी शैक्षणिक अर्हता :
कृषी सेवा केंद्र चालकाचे खालील प्रमाणे शैक्षणीक अर्हता आवश्यक आहे.
बी.एस.सी., कृषी रसायनशास्त्र पदवीधर, कृषीशास्त्र विषयातील पदविका, बी.एससी. रसायनशास्त्र स्नातकोत्तर पदवीसह पीएच.डी. किंवा अभियांत्रिकी रसायनशास्त्राची पदवी ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यातील खत आणि कीटकनाशक परवानाधारकांकडे यापैकी एकही पदवी नसेल, तर दोन वषार्ंच्या आत ही शैक्षणिक अर्हता प्राप्त करून घ्यावी लागते.
काय केले पाहिजे ?
कृषी सेवा केंद्र ज्या ठिकाणी तुम्हाला स्थापन करावयाचे आहे, त्या ठिकाणी गावाची लोकसंख्या किती आहे ? तेथे कृषी सेवा केंद्र चालू शकेल काय ? मालाची विक्री होऊ शकेल काय या बाबींचा विचार आधी करा.
त्यानंतर जागेची निश्चिती करा. जागेची निवड करण्यापूर्वी ती जागा चौका मध्ये आहे का ? किंवा ज्या जागी तुम्ही स्थापन करणार आहात त्या जागेवर ग्राहकाची नेहमी ये-जा होत असते का ? माल वाहतुकीसाठी वाहन त्या जागेवर ये-जा करू शकते का? याचा विचार करा. कृषी सेवा केंद्र हे वर्दळीच्या ठिकणी स्थापन करावयास हवे. जेणे करून सर्वाना केंद्र दिसेल.तुम्ही खते व ओषधे देन्ही विक्री करनार असाल तर तशी दोन्ही चा परवाना वेगवेगळा घ्यायला लागेल.जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी तसेच तिथील जिल्हा परिषद क्रषी विभागाची ही परवाानगी सुधा आवश्यक आहे.
त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. त्यानंतर पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. सर्व कागदपत्राची तीन प्रतीमध्ये संच तयार करावा.एक कॉपी मूळ प्रत, एक कॉपी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावी आणि एक आपल्या कडे ठेवावी.
- PAN CARD
- आधार कार्ड
- पासबुक झेरोक्स
- लाईट बिल
- शैक्षणिक अर्हतेचे मार्क मेमो/टी.सी.
- ऑनलाईन भरलेला फॉर्म
- पैसे भरल्याची पावती/चलन
- कृषी अधिकारी यांचा जागा पाहणीचा दाखला
- जागेचा नकाशा
- व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामपंचायत/म.न.पा./न.पा.)
- नमुना न. 8 (ग्रामपंचायत/म.न.पा./न.पा.)
- जागा भाड्याने असल्यास भाडे करार पत्र
दरवर्षी परवाना नूतनीकरण करताना सर्व परवानाधारकांना शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक केले आहे, दोन वर्षांतून एकदा पायाभूत सुविधा, उत्पादन स्थळ, साठवणूक स्थळ व अभिलेखाची तपासणी अनिवार्य केली आहे. कीटकनाशकाचा उत्पादन परवाना तात्पुरती नोंदणी संपुष्टात येईल त्याच दिवशी कालबाह्य़ होणार आहे.