मित्रानो,
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर/शेताच्या बांधावर/पडीक जमिनीवर फळबाग / वृक्ष लागवड/फुलपीक लागवड योजना हि योजना दिनांक 30/04/2022 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणार आहे. या योजनेची महात्मा गांधी रोजगार हमी योजनेशी सांगड घालून सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जे इच्छुक शेतकरी आहेत ते अर्ज सादर करू शकतात. शेतकऱ्यांच्या बांधावर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर/शेताच्या बांधावर/पडीक जमिनीवर फळबाग / वृक्ष लागवड/फुलपीक लागवड करू शकतात.
प्राधान्य क्रम :
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- विमुक्त जमाती
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
- स्त्री प्रमुख कुटुंब
- दिव्यांग व्यक्ती असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण लाभार्थी
- अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम खालील पात्र लाभार्थी
क्षेत्र मर्यादा :
कमीतकमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.0 हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्र
अर्ज कुठे करावा ? :
ग्रामपंचायत / पंचायत समिती / तालुका कृषी विभाग / वन विभाग
समाविष्ट फळपिके/ वृक्ष व फुलपिके :
1) आांबा 2) काजू3) चिकू 4) पेरु 5) डाळिंब 6) सांत्रा 7) मोसांबी 8) कागदी लिंबू 9) नारळ 10) बोर 11) सीताफळ 12) आवळा 13) चिंच 14) कवठ 15) जाांभुळ 16) कोकम 17) फणस 18) अांजीर 19) सुपारी 20) बाांबू 21) साग 22) जड्रोफा 23) गिरिपुष्प 24) कडीपत्ता 25) कडुलिंब 26) सिंधी 27) शेवगा 28) हदगा 29) पानसुपारी 30) केळी (3 वर्ग) 31) ड्रॅगनफ्रुट 32) ॲव्हाकॅडो 33) द्राक्ष 34) चांदन 35) खाया 36) निम 37) चारोली 38) महोगनी 39) बाभूळ 40) अांजन 41) खैर 42) ताड 43) सुरु 44) रबर 45) महारुख 46) मँमजयम 47) मेमलया डुबया 48 ) तुती 49) ऐन 50) शिसव 51) निलगिरी 52) सुबाभुळ 53) शेमी 54) महुआ 55) गुलमोहर 56) बकान निंब 57) चिनार 58) शिरीष 59) करवांद
फुलझाड – 1) गुलाब 2) मोगरा 3) निशीगांध 4) सोनचाफा
औषधी वनस्पती – 1) अर्जुन 2) असान, 3) अशोका, 4) बेहडा, 5) हिरडा, 6) बेल, 7) टेटु, 8) डीके माली, 9) रक्त चंदन, 10) रिठा 11) लोध्रा, 12) आइन, 13) शीवन, 14) गुग्गुळ, 15) बीब्बा 16) करांज
मसाल्याची पीके – 1) लवांग, 2) दालचीनी, 3) मीरी 4) जायफळ