मित्रांनो, रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक तसेच सामुहिक लाभ देण्यात येतो. यासाठी तुमच्या गावातून ग्रामसभेद्वारे/मासिक सभेद्वारे निवड केली जाते. त्यांतर संबंधी विभागाकडे विहित कागदपत्रासह अर्ज सादर केला जातो. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणच्या संबधित विभागाच्या रोजगार हमी योजना विभागाकडून त्या योजनेचे Secure Softwereद्वारे इस्टीमेट तयार करून तांत्रिक मान्यता घेतली जाते. त्यानंतर संबंधित कामासाठी कार्यारंभ आदेश दिला जातो.
अ.क्र. | म.गा.रो.ह.यो. अंतर्गत वैयक्तिक/सामुहिक योजनेचे नाव | रक्कम |
1. | नाडेप कम्पोस्टिंग | 10746/- |
2. | गांडूळ खात (खड्डा) | 11520/- |
3. | वैयक्तिक शौचालय | 12000/- |
4. | गाय/म्हैस गोठ्याचे कॉन्क्रीटीकरण, मूत्र संचयन, गव्हाण व छत | 70000/- |
5. | शेळी पालन शेड | 35000/- |
6. | कुक्कुटपालन शेड | 40000/- |
7. | रेशीम उद्योग | 2.82 लाख |
8. | शोष खड्डा (नांदेड Pattern) | 2566/- |
9. | विहीर पुर्णभरण | 12000/- |
10. | शेत बंध बंदिस्ती | 10 ते 14 हजार (जमीन प्रकारानुसार) |
11. | फळबाग लागवड | फळांच्या प्रकारानुसार |
12. | संजीवक किंवा अमृत पाण्यासाठी खड्डा | 2000/- |
13 | मत्स्य व्यवसायासाठी ओटे | — |
परंतु मित्रानो, वैयक्तिक लाभासाठी तुमची ग्रामसभेमार्फत/मासिक सभेमार्फत जर निवड केली असेल तर सुरुवातीला आपल्याला अर्ज करावा लागतो तो अर्ज खालील प्रमाणे दिला आहे.