मित्रांनो,
तुम्ही जर राशनकार्ड धारक असाल आणि जर तुम्हाला तुमच्या शिधापात्रीकेतून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात एक फॉर्म भरून तुमच्या तहसील कार्यालयात सादर करावा लागेल.
शिधापात्रीकेतून नाव कमी करण्याचे महत्वाचे कारण एक तर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, कुटुंबातील मुलीचे लग्न झाले असेल,जन्म, स्थंलातरीत होणे, स्वतंत्र होणे, स्वतंत्र वास्तव्य, नोकरीनिमित्त स्थलांतरीत होणे, इत्यादी करणामुळे आपल्याला शिधापत्रीकेतून नाव कमी करण्याची गरज भासते.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- विहित नमुन्यात अर्ज
- मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका व आधार कार्ड
- मृत्यू झाला असल्यास मृत्यू दाखला व आधार कार्ड
- स्थलांतरित असल्यास मूळ कार्ड व आधार कार्ड
- नोकरीनिमित्त स्थंलातरीत झाल्यास बदलीच्या आदेशाची झेरॉक्स प्रत व नव्या ठिकाणच्या वास्तव्याचा पुरावा
- नाव कमी करायचे संबंधित व्यक्तीचे संमत्री पत्र
लागणारा कालावधी
शिधापत्रीकेतून नाव कमी करण्यासाठी अर्ज दिल्यानंतर 1 दिवसात नाव कमी केले जाते.
अधिक माहितीसाठी http://mahafood.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्या.