मित्रांनो ,
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरींसाठी आता 3 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 4 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. पात्रता आणि निकष मध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरींचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया बाबत शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे.
या शासन निर्णय अंतर्गत विहिरंची अमलबजावणी कशी करावी या विषयी संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे. यामध्ये लाभार्थी निवड निकष काय असावे? लाभार्थी पात्रता काय असावी ? विहीर कोठे खोदु नयेत या विषयी माहिती सांगितली आहे.
लाभधारक निवड :
लाभधारक निवड प्राधान्य क्रम –
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- विमुक्त जाती
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
- स्त्री कुटुंब प्रमुख
- विकलांग व्यक्ती कुटुंब प्रमुख
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजना खालील लाभार्थी
- अनुसूचित जाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे ) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
- सीमांत शेतकरी (2.5 पर्यंत जमीन)
- अल्प भूधारक शेतकरी (5 एकर पर्यंत)
लाभधारक पात्रता :.
- लाभार्थी कडे 0.40 हे. क्षेत्र असावे.
- आधीच्या विहिरी पासून 500 मीटर लांब अंतर असावे
- अनुसूचित जाती व जमातींना हि अट लागू नाही
- ७/१२ वर आधीची विहीर नोंद असू नयेत
- नमुना नंबर ८ अ चा उतरा
- जॉब कार्ड धारक
लागणारी कागदपत्रे :
- ७/१२ उतरा
- ८ अ चा उतरा
- जॉब कार्ड
- सामुदायिक शेत असेल तर त्याचा पंचनामा
- जातीचे प्रमाण पत्र
- ग्राम सभा ठराव