ration-book

केशरी, पिवळे आणि पांढरे राशन कार्ड तिहेरी योजना

मित्रांनो, केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत हि योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात 1 जून 1997 रोजी झाली. जे दारिद्र्य रेषेखाली गरीब कुटुंबे आहेत अशा कुटुंबाना कमी किमतीत अन्न धान्य मिळावे, या मुख्य उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सन 2000 च्या लोक संख्येनुसार दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांची कुटूंब मोडतात त्यांची संख्या ( इष्टांक ) निश्चित केली करण्यात आली आहे. महारष्ट्रातील गरीब कुटुंबाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कमी किमतीमध्ये अन्नधान्य पुरवले जाते.

यासाठी शासनाने केशरी रंगाचे, पिवळे रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे राशन कार्ड वितरीत करण्यात आले. या राशन कार्ड नुसर वेग वेगळे निकष ठरविण्यात आले आहे.5 मे, 1999 पासून तिहेरी कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. हे निकष काय आहेत या बद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो काही काही ठिकाणी या राशन कार्डचा ओळख पुरावा हि मानण्यात येतो.

केशरी रंगाचे राशन कार्डचे निकष :

केशरी रंगाच्या राशन कार्ड धारकांना ए.पी.एल (A.P.L) असेही संबोधण्यात येते A.P.L म्हणजे Above Powerty Line (दारिद्य रेषेवरील कुटुंबे). केशरी रंगाच्या राशन कार्ड चे निकष आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल.

  1. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत आणि ४४ हजारांपेक्षा अधिक अशा केशरी रंगाचे राशन कार्ड दिले जाते.
    • कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन असू नये. यामध्ये टॅक्सी चालक यांना वगळण्यात आले आहे.
  2. कुटुंबात जेवढे सदस्य आहेत, त्या सर्व सदस्य मिळून त्यांच्या नावावर 4 हे.पेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन नसावी.

पिवळ्या रंगाच्या राशन कार्ड साठीचे निकष :

पिवळ्या रंगाच्या राशन कार्ड धारकांना बी.पी.एल (B.P.L) असेही संबोधण्यात येते B.P.L म्हणजे Below Powerty Line (दारिद्य रेषेखालील कुटुंबे). पिवळ्या रंगाच्या राशन कार्ड धारकाचे निकष खालील प्रमाणे सांगता येईल.

  1. कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसायाने डॉक्टर, वकील, अभियंता, सि.ए. नसावा.
  2. कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावा.
  3. कुटुंबाच्या घरी दूरध्वनी नसावा.
  4. कुटुंबातील कोणताही सदस्यकडे चार चाकी वाहन नसावे.
  5. सर्व कुटुंबातील सदस्याकडे मिळून दोन हेक्टर जिरायत किंवा एक हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागायत (दुष्काळी तालुक्यात त्याच्या दुप्पट क्षेत्र) जमीन नसावी.

पांढऱ्या रंगाचे राशन कार्डचे निकष :

ज्या कुटुंबाना पांढरे रंगाचे राशन कार्ड द्यावयाचे आहे त्यासाठी निकष खालील प्रमाणे सांगता येईल.

  1. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना हे कार्ड वितरीत करण्यात येते.
  2. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना हे कार्ड दिले जाते.
  3. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावे मिळून चार हे. पेक्षा जास्त बारमाही शेतजमीन असेल अशा कुटुंबांना हे कार्ड दिले जाते.

अधिक माहितीसाठी http://mahafood.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *